Home राजनीति आचारसंहिता : नगर परिषदेने होर्डिग्स, पोस्टर काढले

आचारसंहिता : नगर परिषदेने होर्डिग्स, पोस्टर काढले

51
0

लोकसभा निवडणूक-२०२४
गोंदिया :
लोकसभा निवडणुकीच्या महापर्वाचा कार्यक्रम आज दुपारी ३ वाजता जाहिर झाला. कार्यक्रम जाहिर होताच आचारसंहिता लागु झाली आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात लावण्यात आलेल्या राजकीय पुढारी, कार्यकर्त्यांचे होर्डिग्स, पोस्टर, बॅनर काढून आचारसंहिताची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. गोंदिया नगर परिषदेसह जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची यंत्रणा कामाला लागली आहे.
मागील सहा महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी जिल्ह्यात जोमात सुरू आहे. निवडणूक लढविणारे इच्छूक उमेदवारांकडून प्रचार अभियान सुरू करण्यात आले आहे. एवढेच नव्हेतर इच्छूकांचे समर्थक कार्यकर्तेही निवडणूक पुर्वीच्या प्रचार अभियानात सहभागी झाले आहेत. धार्मिक सण, वाढदिवस, शासन निर्णयाचे श्रेय, विविध उपक्रमाची जनजागृती या सर्व बाबींना घेऊन मोठ्या प्रमाणात बॅनर, पोस्टर, होर्डिंगबाजी गेल्या सहा महिन्यांपासून केली जात आहे. आज, केंद्रीय निवडणुक आयोगाने दुपारी ३ वाजता निवडणूक कार्यक्रम जाहिर करताच आदर्श आचारसंहिता लागु करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या यंत्रणेला कामाला लागण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुरूप यंत्रणेकडून शहरात लावलेले बॅनर, पोस्टर, होर्डिग उतरविण्याचे काम सुरू झाले आहे. आज शहरात गोंदिया नगर पालिकेकडून कर्मचाºयांना कामाला लावून रात्री उशिरापर्यंत होर्डिग, बॅनर काढण्याची मोहिम सुरू होती.