Home गोंदिया जिल्हा संघठीत समाजात निमार्णाचा विश्वास जागृत होतो: अनिल जोशी

संघठीत समाजात निमार्णाचा विश्वास जागृत होतो: अनिल जोशी

135
0

संघाचा गोंदिया नगर वर्षप्रतिपदा उत्सव
गोंदिया :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जे सहा उत्सव साजरे केले जातात त्यात तिन उत्सवांना विशेष महत्व आहे. यात विजयादशमी, वर्षप्रतिपदा, हिंदू साम्राज्य दिवस यांचा समावेश आहे. या उत्सवांचा उद्देश्य समाजाला संघटीत करून त्यांच्यात विजयाची आकांक्षा निर्माण करणे आहे. कारण संघटीत समाजात काहीही अशक्य नसून कोणतेही गोष्ट निर्माण करण्याचा विश्वास जागृत होतो. राम मंदिर निर्माण व प्राणप्रतिष्ठा याचे मोठे उदाहरण असून यामुळे समाजात हर्ष व ऊर्जेचे संचार झाल्याचे सर्वांनी बघितले आहे. हा हिंदू जागरणाचा सुखद परिणाम असून सर्वांनी प्रभू श्रीरामांचा आदर्श घेऊन धर्माच्या आधारावर चालण्याचा संकल्प घ्यावा, असे प्रतिपादन संघाचे पश्चिम क्षेत्र बौद्धिक प्रमुख अनिल जोशी यांनी केले. ते ९ एप्रिल रोजी येथील सरस्वती महिला विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोंदिया नगराच्या वर्षप्रतिपदा उत्सवात प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.
यावेळी मंचावर जिल्हा संघचालक लिलाराम बोपचे, नगर संघचालक मिलींद अलोणी, नगर सहसंघचालक डॉ. मुकेश येरपूडे उपस्थित होते.
पुढे जोशी म्हणाले, विश्वाची प्राचिन कालगणना आपली असून आज युगाब्ध ५१२६ व विक्रम सवंत २०८१ मध्ये आपण आहोत. यामुळेच आपली सभ्यता व संस्कृति किती जुनी आहे हे सर्वांना माहित आहे. नविन वषार्चा प्रारंभ नविन संकल्प घेण्याचा असतो. आजच्याच दिवशी डॉ. केशव हेडगेवारजी यांचा जन्मदिन असल्याने यानिमित्य त्यांना स्मरण करण्याची संधी आपणांस मिळते. संघात व्यक्तिपूजा नसून तत्वपूजा आहे. मृतपाय समाजात डॉ. हेडगेवार यांनी प्राण फुंकले. आज समाज संघटीत होऊन आपल्या समस्या सोडविण्यासाठी सक्षम झाला आहे. म्हणूनच जेव्हा संभ्रमावस्था निर्माण होते तेव्हा डॉ. हेडगेवार यांचे स्मरण केल्याने ऊर्जा प्राप्त होते असेही ते म्हणाले. संघाचा शताब्दीचा हा अंतिम कालखंड सुरू आहे. संघाने मागील शंभर वर्षात व्यक्ति निर्माण व समाज परिवर्तनासाठी कार्य केले. समाजातील जे दोष, चुकीच्या प्रथा, परंपरा निर्माण झाल्या होत्या त्या समाप्त करण्यासाठी संघ प्रयत्नशिल आहे. राष्ट्र निर्माण व समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनदिनीत पाच प्रमुख गोष्टी अंगीकाराव्या. यात प्रामुख्याने समाजात समरसता निर्माण करणे, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संवर्धन व रक्षण, स्वदेशीचा अंगीकार व नागरिक शिष्टाचार असल्याचे त्यांनी सांगीतले.
जिल्हा संघचालक लिलाराम बोपचे यांनी काही स्वयंसेवकांच्या नवीन दायित्वाची घोषणा केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, परिचय व आभार शरद काथरानी यांनी मानले. यावेळी नगरातील स्वयंसेवक व गणमान्य नागरिक उपस्थित होते.