Home महाराष्ट्र खासदार प्रफुल पटेल हे इकबाल मिर्चीचे ‘पार्टनर’, राष्ट्रवादीचे किरण अतकरी यांच्या वक्तव्याने...

खासदार प्रफुल पटेल हे इकबाल मिर्चीचे ‘पार्टनर’, राष्ट्रवादीचे किरण अतकरी यांच्या वक्तव्याने खळबळ

81
0

भंडारा : नबाब मलिक यांनी दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमिनीचा सौदा केला होता. यावरून भाजपने त्यांना टार्गेट केले आहे. मात्र, जमिनीचा सौदा करणाऱ्या पेक्षा त्याचा पार्टनर असणे हा अधिक मोठा गुन्हा आहे. इकबाल र्मिचीसोबत खासदार प्रफुल पटेल यांची पार्टनरशिप असल्याने नवाब मलिकपेक्षा प्रफुल पटेल यांचा गुन्हा मोठा आहे, असे खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे भंडारा जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी आज पत्रकार परिषदेत खा. पटेलांबद्द्दल केले.