Home विचारमंच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना संविधान रुपी अधिकारांचे कवच दिले : शारदा बडोले

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना संविधान रुपी अधिकारांचे कवच दिले : शारदा बडोले

94
0

सडक/अर्जुनी (गोंदिया) : भारतीय संस्कृतीमध्ये महिलांची महती शौर्याची राहिलेली आहे. परकियांच्या शासन काळात महिला गुलामगिरीचे जीवन जगत होते. सन्मानाचे जीवन महिला भगिनींच्या वाट्याला आलेच नाही. देश स्वातंत्र्य झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय घटना लिहिली. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अंगिकृत करण्यात आले. त्या संविधानाचे माध्यमातूनच सर्व महिलांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी,अधिकार मिळाले. आजची महिला अबला राहिली नसून सबला बनली आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना संविधान रुपी अधिकाराचा कवच दिले असल्याचे प्रतिपादन कृउबा संचालक शारदाताई राजकुमार बडोले यांनी केले.
सडक अर्जुनी तालुक्यातील युवा नेटवर्क मैत्री मंच सौंदडच्या वतीने महिला जनजागृती कार्यक्रम व नारी सन्मान सोहळा १५ मार्च रोजी आयोजित करण्यात आला. याप्रसंगी त्या व्यासपीठावरून बोलत होते. या महिला जनजागृती कार्यक्रम व नारी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उषा शहारे होते. यावेळी नुतन दहिवले,डॉ.रिता लांजेवार,गायत्री इरले,रेखा संग्रामे, जि.प.सदस्या निशा तोडासे,कुंदा साखरे, ज्योती बर्वे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरुवातीला सर्वप्रथम थोर समाजसेविकांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शासकिय सेवेत विविध पदावर रुजू झालेल्या डॉ.नेहा बर्वे, शीतल नागपूरे, नैनिता टेंभुर्णे, सीमा निंबेकर, दिपाली डोंगरवार यांचा नारी सन्मान पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजनासाठी युवा नेटवर्क मैत्री मंच या महिलांनी सहकार्य केले.