Home Uncategorized शिक्षक-पालक सहविचार सभा संपन्न

शिक्षक-पालक सहविचार सभा संपन्न

56
0

देवरी, (गोंदिया) : स्थानिक छत्रपती शिवाजी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात “शिक्षक-पालक” सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य एम. जी. भुरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पुरुषोत्तम शिवणकर, जयश्री चांदेवार, एस. टी. भांडारकर उपस्थित होते. यावेळी प्रथमतः माँ शारदा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. तदनंतर शिक्षक पालक संघाची कार्यकारिणी गठित करण्यात आली. यामध्ये जयश्री चांदेवार, उत्तम पोले, भाऊराव सोनवाने व पुरुषोत्तमजी शिवणकर या मान्यवरांची निवड करण्यात आली तसेच निवडलेल्या सर्व सदस्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान पालकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी हितगुज करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. जी. भुरे यांनी पालकांच्या समस्या जाणून घेऊन उपस्थित पालकांना यथोचित मार्गदर्शन केले. या सभेचे प्रास्ताविक एस. टी. भांडारकरयांनी मांडले. सूत्र संचालन कु. टी. एस. कळंबे यांनी केले तर आभार कु. ए. टी. मते यांनी मानले. यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.