कुटूंबावर आली उपासमारीची वेळ : प्रशासन कुंभकर्ण झोपीत
अर्जुनी मोरगाव, (गोंदिया) : केंद्र सरकारने 2005 साली राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या नावाची योजना आणली. तिचे कायद्यात रूपांतर करून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अस्तित्वात आणून ग्रामीण भागातील अकुशल मजुरांना 100 दिवसाची प्रत्येक जाबकार्डला कामाची हमी दिली. तिचा विस्तार संपुर्ण भारतभर 2008 ला करण्यात आला असून मजुरांवर देखरेख ठेवण्याकरिता तसेच अहवाल सांभाळण्याकरिता व दस्तावेज अद्यावत ठेवण्याची जबाबदरीकरीता गाव स्तरावर ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आली. तरी दीर्घकाळापासून अत्यल्प व तुटपुंज्या मानधन मिळणारा ग्राम रोजगार सेवक सन एप्रिल 2024 पासून मानधनविना वंचित आहे. आज राज्यात शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या नियोजीत तारखेला होत असून ग्राम रोजगार सेवकाला तुटपुंजे मानधन मिळत असले तरी सुद्धा त्यांचे मानधन पाच महिन्याचा दीर्घ कालावधी होऊन भेटत नसल्याने ग्रामरोजगार सेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामरोजगार सेवकाचे मानधन झालेल्या कामाच्या 6 टक्के निधीतून मिळत असल्याने सदर योजना केंद्र सरकारची असल्याने इतर राज्याच्या तुलनेत मासिक मानधनात तापवत आहे. असे असली तरी इतर राज्यात नियोजित वेळेवर मानधन मिळत आहे, मग महाराष्ट्रात उशीर का? असा प्रश्न अद्यापही सुटलेला दिसत नाही. निदान 2016 पासून प्रवास व अल्पोहार भत्ता, स्टेशनरी खर्च,प्रोत्साहन मानधन तसेच वाढीव मानधन व मार्च 2024 ते जून 2024 पर्यत रोजगार सेवकांचे थकीत मानधन मिळाले नाही. मात्र, सणासुदीच्या काळात महागाईने होरपळून गेलेल्या ग्राम रोजगार सेवकाचे प्रलंबित मानधन पाच महिन्यांपासून मानधन जमा व्हावे, ही अपेक्षा होती. पण मानधन जमा नाही झाल्यामुळे रोजगार सेवकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. भंडारा जिल्ह्यात एकूण 528 ग्राम रोजगार सेवक काम करत आहे. मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील अकुशल मजुरांना रोजगार देण्याचा काम ग्राम रोजगार सेवक करीत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे पुर्ण करून घेण्यात ग्राम रोजगार सेवकांची महत्वाची भुमिका असते. ग्राम रोजगार सेवकांना कामाचे स्वरूप पाहून मानधन ठरविण्यात येत असल्याने गाव पातळीवर घरकूल बांधकाम, वृक्ष लागवड, फळबाग लागवड, विहिरी, शोषखड्डे, भातखाचरे, मजगी, सार्वजनिक स्वरूपाचे कामे, वयक्तिक स्वरूपाचे कामे, यासह विविध कामे करून घेण्यासाठी ग्राम रोजगार सेवक मोलाचे योगदान देतात. दरम्यान भंडारा जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवकांना गत मार्च महिन्यापासून तसेच 2016 पासून देय असलेले मानधन मिळाले नसल्याचे रोजगार सेवकांचे म्हणने आहे. निदान येणारा गुरू पौर्णिमापासून सुरूवात होणाऱ्या नागपंचमी, रक्षाबंधन सनउत्सव झाले तरी मानधन मिळाले नाही. पण येणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमी, बैल पोळा या सनासुदी पूर्वी मानधन होईल, अशी अपेक्षा असून त्यांच्या आशेवर पाणी फेरल्या तर जाणार नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रोजगार सेवकांचे येणारे सण, उत्सव अंधारातच राहणार तर नाही याकडे लक्ष देऊन तालुका स्तरावरून तसेच जिल्हा स्तरावरून प्रलंबित मानधनाचे देयक सादर करून लवकरात लवकर प्रशासनाकडून ग्राम रोजगार सेवकांच्या बँक खात्यावर मानधन वितरीत करावे अशी मागणी गोंदिया जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांनी केली आहे.

