Home Uncategorized वन्य प्राण्यांचा शिकार करण्याच्या बेतात असलेल्या आरोपीस अटक

वन्य प्राण्यांचा शिकार करण्याच्या बेतात असलेल्या आरोपीस अटक

83
0

गोंदिया : शेतात ताराचे फासे लावून वन्य प्राण्यांचा शिकार करण्याच्या बेतात असलेल्या एका आरोपीला वनपरिक्षेत्र कार्यालय देवरीच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारे ताराचे फासे व इतर साहित्य जप्त केले. जयलाल सुकराम कोवाची ( वय 49 रा. सालई, ता. देवरी, जि. गोंदिया) असे आरोपीचे नाव आहे.वनपरिक्षेत्र कार्यालय उत्तर देवरी अंतर्गत अधिनस्त कर्मचारी व WTI चे वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाचे पथक देवरी उपक्षेत्रातील नियतक्षेत्र चिचेवाडा संरक्षित वन कक्ष क्र.५७८ मध्ये वनालगत व शेती परिसरात गस्ती करीत असताना शेतात वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने ताराचे फासे लावलेले निदर्शनास आले. यावर आरोपी शेतमालक जयलाल सुकराम कोवाची याला 18 ऑगस्ट रोजी ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. त्याला अटक करुन देवरी येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय यांच्या समक्ष हजर करण्यात आले. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला गुन्ह्याच्या अधिक चौकशीकरीता वनकोठडी सुनावली आहे. वन अधिकाऱ्यांनी शेतात लावलेले ताराचे फासे जप्त केले आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई यांच्या मार्गदर्शनात व सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) सचिन डोंगरवार यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर देवरी सचिन धात्रक, क्षेत्र सहाय्यक एम.एस. कुंभरे, एम.व्ही. कोरे, वनरक्षक एच.जी.भोयर, एस. एम. फुले, पी.जी. सोनवाने, के. एम. बरगे, ए.एम. अंबादे व वनमजूर तेजराम तुलावी यांनी केली. सदर गुन्हा प्रकरणाचा तपास उत्तर देवरी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एम. धात्रक करीत आहेत.