Home Uncategorized चोरी गेलेल्या मुद्देमालासह आरोपीला अटक; गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

चोरी गेलेल्या मुद्देमालासह आरोपीला अटक; गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

139
0

गोंदिया : शहरातील रिलायन्स जियो बेस सेंटर मधील एसी मशीनचे आऊटडोर युनिटमध्ये लागलेल्या 70 हजार रुपये किमतीच्या तांब्याचे पाईपची चोरी अज्ञात आरोपीने चोरून नेला होता. वरिष्ठांच्या निर्देशानुसार गोंदिया शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त माहितीच्या आधारे चोरी करणाऱ्या आरोपीला मुद्देमालासह अटक केले. योगश गोविंदराव उगेमुगे (वय 32, रा. बजाज वार्ड, मरघट रोड, गोंदिया) असे आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील खमारी येथील फिर्यादी सतिश शामलाल कावळे हे रिलायन्स जियो बेस सेंटर गोंदिया येथे टेक्नीशियन म्हणुन काम करतात. कावळे यांनी 23 एप्रिल 2024 रोजी जियो बेस सेंटरमधील ए. सी. मशीन बंद पडल्याने त्यांनी ए. सी. मंशीनचे आऊटडोर युनीटची पाहणी असता युनीट मध्ये लागलेले 1 इंचीचे 30 मीटर ताब्यांचे पाईप 1 नग, 1.5 इंचीचे 30 मीटर ताब्यांचे पाईप 1 नग असा एकुण 60 मीटर ताब्यांचे पाईप असा एकूण 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोराने चोरुन नेले. फिर्यादीचा तोंडी रिपोर्टवरून पो. स्टे. गोंदिया शहर येथे अप क्र. 263/2024 कलम 379 भादंवी अन्वये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले होते. वरिष्ठांच्या निर्देश व सूचनाखाली शहर पोलीस ठाणेचे पो. नि. किशोर पर्वते यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेवुन आरोपी योगश गोविंदराव उगेमुगे (वय 32) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता चोरीस गेलेले मुद्देमाला पैकी पेचकलेले तांब्याचे पाईपचे तुकडे अंदाजे 25 मीटर कि. 27 हजार व ताब्यांवे तार वजन अंदाजे 5 किलो कि. 5 हजार असा एकूण 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास पोहवा कवलपालसिंग भाटीया करीत आहेत. ही कामगीरी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया रोहीणी बानकर यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक किशोर पर्वते, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा कवलपालसिंग भाटीया, जागेश्वर उईके, दिपक रहांगडाले, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, निशिकांत लोंदासे, पोशि. दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, मुकेश रावते यांनी केली.