देवरी, (गोंदिया) : महाराष्ट्र शासनाने नुकतीच लागू केलेली लाड़की बहिन योजना सुरु होताच गावागावात अर्ज भरण्याची सुविधा शासनाने केली आहे. आंगणवाडी सेविकांच्या मार्फ़त हे फार्म ऑनलाइन करण्यात येत आहेत. ग्राम पंचायतच्या माध्यमाने आवश्यक कागदपत्राबाबत महिलांना मार्गदर्शन देण्यात येत आहे. या कार्यक्रमात देवरी नगर पंचायतचे माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक आफ़ताब शेख यांनी महिलांकरिता आपल्या आफ़ताब मंगल कार्यालयात स्वख़र्च्याने चार ते पाच शिक्षित युवकांना नारी शक्ति दूत ऐपचे प्रशिक्षण दिले. ते युवक नि:शुल्क लाड़की बहिन योजनेचे ऑनलाइन फार्म दाखल करून देत शासनाला सहकार्य करीत आहे. आज 23 जुलैपर्यन्त अंदाजे हजाराच्यावर महिलांची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अश्याच प्रकारे जूने मतदार कार्ड जे एम.टी. सिरीजचे (ब्ल्याक एन्ड व्हाईट) निवडणूक मतदार कार्ड आहेत. ते डिजीटल कार्ड बनवून देण्याचे काम देवरी शहरासह तालुक्यावासीयांकरीता सुरू आहे. नगरसेवक आफ़ताब शेख यांनी देवरी शहरातीलच नव्हे तर तालुक्यातील महिलांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन आपले ऑनलाइन प्रक्रिया करुण घेण्याचे आवाहन केले आहे.

