जि.प.सदस्य उषा शहारे यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी
देवरी : तालुक्यातील ककोडी जि.प. क्षेत्रातील चिपोटा ग्रा.पं. अंतर्गत येणा-या धवलखेडी येथील तलावाचे दुरूस्तीचे बांधकाम त्वरीत करा, अशी मागणी जि.प. सदस्य उषाताई शहारे यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. तालुक्यातील धवलखेडी तलावाचे ल.पा. विभाग गोंदिया तलावाचे पार बांधकाम दुरूस्तीचे काम मागील दोन वर्षापासून थंड बस्त्यात आहे. गेल्या वर्षी लोकवर्गणी मधून तलावाची दुरूस्ती करण्यात आली होती. यावर्षी तलाव दुरुस्त झाला नाही तर शेकडो शेतकऱ्यांना नुकसान होणार आहे. या विषयाला धरून या क्षेत्राचे जि.प. सदस्य उषा शहारे यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत मागणी केली होती. तसेच वेळॉवेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना शुधा सांगण्यात येत होता. पण तरी सुद्धा अजून या तलावाचे काम अपूर्ण पडलेले आहे. त्यामुळे या भागातील शेतक-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. मागील दोन वर्षापासून धवलखेडी येथील तलावाचे पार तुटलेली आहे. त्यामुळे तलावात पाणी राहत नाही आणि वरून पावसाळ्यामध्ये शेतक-यांच्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण मागील वर्षीच या भागातील शेतक-यानी लोकवर्गणीतून या तलावाची तातपुरती दूरूस्ती केले होती. या गंभीर मुद्यावर उषा शहारे यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत या विषयाला धरून सभागृहाचे लक्ष केंद्रित केले होते. तसेच जिल्हा प्रशासनाकडे 6 जानेवारी 2024 रोजी आपल्या पत्रातून मागणी केली आहे. यावेळी जिल्हा नियोजन समिती (डी.सी.पी.) मधून 39.35 लक्ष रूपयाचे निधी या तलावाच्या दुरूस्ती करीता मंजूर झाले असल्याचे असे सांगण्यात आले. आता प्रश्न निर्माण होतो की, लवकरच मानसुनला सुरूवात होणार आहे. तरी देखील या धवलखेडी तलावाचे दुरूस्तीचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे येत्या पावसाळ्यात या भागातील शेतक-यांमध्ये तलाव फुटण्याची भिती राहणार आहे. तरी जिल्हा प्रशासन या तलावाचे दुरूस्ती कामाचे टेंडर लवकर करून या तलावाच्या दुरूस्तीच्या कामाची त्वरीत सुरूवात करावी अशी, मागणी जि.प.सदस्य उषा शहारे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. जेणे करून शेतक-यांचे नुकसान होणार नाही. जर या तलावाच्या दुरूस्तीचे कामे त्वरीत सुरू करण्यात आले नाही तर या मागणीला धरून शेतक-यासोबत उपोषनावर बसण्याचा ईशारा जि.प. सदस्य उषाताई शहारे यांनी दिला आहे.

