बडोले फाउंडेशनच्या वतीने नवोदय विद्यालयासाठी पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार
सडक अर्जुनी (गोंदिया) : विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून त्यानुसार शिस्त लावून स्वतःला घडवलं पाहिजे. उच्च शिक्षण घेतल पाहिजे. यासाठी पालकांनी त्यांचे गुण ओळखून योग्य संस्कार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. सोबतच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्याला त्याच्या ध्येयाकडे घेऊन जाण्यास मदत करते आणि म्हणूनच शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनला अंगीकारून जीवनाची पुढील दिशा ठरवावे, असे आवाहन माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री राजकुमार बडोले यांनी विद्यार्थ्यांना केले. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या 36 विद्यार्थ्यांचा सत्कार राजकुमार बडोले फाऊंडेशनच्या वतीने रविवार, 19 मे रोजी माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आला, यावेळी ते अध्यक्षस्थानवरून बोलत होते. जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या जिल्ह्यातील एकूण 80 विद्यार्थी पैकी 36 विद्यार्थी हे सडक अर्जुनी व अर्जुनी मोर या तालुक्यातील असून सर्वांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्या कविता रंगारी, तोडासे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शारदा बडोले, गोंदिया जिल्हा शिक्षक संघ संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर, पंचायत समिती सडक अर्जुनीचे उपसभापती शालिंदर कापगते, अर्जुनी/मोर पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे, पंचायत समिती सदस्य चेतन वडगाये, वर्षा शहारे, माजी सभापती गिरीधर हत्तीमारे, माजी उपसभापती राजेश कठाणे, तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, कोहमारा संरपच प्रतिभा भेंडारकर, रंजना भोई, वराठे , बोरकर , मेश्राम, राजेश कडूकर, सुरेश अमले, सुधीर वाहने, राऊत, राजकुमार बडोले फाउंडेशनचे प्रशांत शहारे आणि मोठया संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शालिंदर कापगते यांनी केले तर आभार प्रदर्शन चेतन वडगाये यांनी मानले.

