Home गोंदिया जिल्हा विनयभंगाच्या नराधमास तीन वर्षाचा सश्रम कारावास

विनयभंगाच्या नराधमास तीन वर्षाचा सश्रम कारावास

27
0

जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्वाळा; सन २०१५ चे प्रकरण
गोंदिया :
सालेकसा येथील १७ वर्षीय पिडीत मुलीशी लज्जास्पद वागणूक देत विनयभंग करणार्‍या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने तीन वर्षाचा सश्रम कारावास व १० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा निर्वाळा १५ एप्रिल रोजी न्या.ए.एम.खान यांना दिला. भुमेश्वर रिकीराम मानकर (२८) रा.सालेकसा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
प्रकरण असे की, सन २०१५ मध्ये दिवाळीच्या दिवशी १२ नोव्हेंबर च्या सायंकाळी पिडीत मुलगी घराच्या अंगणात दिवे लावत होती. दरम्यान सुना मौका पाहून आरोपी भुमेश्वर रिकीराम मानकर याने तिला लज्जास्पद कवटाळले. दरम्यान पिडित मुलीने आरडाओरड केल्यावर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढले. या घटनेची नोंद पिडिता मुलीच्यात क्रारीवरून सालेकसा पोलिस ठाण्यात करण्यात आली. आरोपी भुमेश्वर मानकर विरूध्द बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ व कलम ३, (१), (११) तसेच अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती कायदा १९८९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी देविदास ईलमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना यांच्या माध्यमातून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले. सरकार पक्षाचे वकिल क्रिष्णा डी पारधी यांनी न्यायालयासमक्ष नऊ साक्षीदार तपासले. साक्ष आणि वकिलाचा युक्तीवाद तसेच कागदोपत्री पुरावा व वैद्यकीय अहवालाच्या आधारावर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. या प्रकरणाचा निर्वाळा देत न्या.ए.एम.खान यांनी आरोपीला तीन वर्षाचा सश्रम कारावास व १० हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास दोन महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पोलिस पक्षाकडून दिपा भैसारे यांनी कामकाज पाहिले.
……………
कलमातंर्गत ठोठावलेली शिक्षा
आरोपी भुमेश्वर मानकरविरूध्द बाल लैगिंग अत्याचार संरक्षण अधिनियमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कलमातंर्गत आरोपीला तीन वर्षाचा सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास २ महिन्याचा अतिरिक्त कारावास त्याचप्रमाणे कलम ३ (१) (११) व अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत सहा महिन्याचा अतिरिक्त कारावास आणि ५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास दोन महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.