
- गोंदिया येथे जाहिर प्रचार सभा
गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या दशकभराच्या काळात देशात अनेक विकासात्मक, लोककल्याणकारी कामे झाली. देशात विकासाची बुलेट ट्रेन सुसाट झाली आहे. मोदी इंजिन तर सर्व घटक पक्ष डब्बे आहेत. या गाडीत सर्वांना बसवून विकासाचा प्रवास सुरू आहे. मोदींची ट्रेनच देशाला विकासाकडे नेऊ शकते. मोदींकडे विकासाचा अजेंडा आहे. तर इंडिया आघाडीच्या ट्रेनचे सर्वच पक्ष इंजिन असून बोगीच नाही. त्यांच्या ट्रेनचे इंजिन ठप्प व दिशाहीन झाले आहे. मोदींच्या नेतृत्वात देश सर्वच बाबतीत सशक्त झाले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ते आज १६ एप्रिल रोजी शहरातील कुडवा नाका येथील टी बी हॉस्पिटलच्या मैदानात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी उमेदवार सुनिल मेंढे, जनता की पार्टी चाबी संघटनेचे आ. विनोद अग्रवाल, माजी मंत्री परिणय फुके, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. राजेंद्र जैन, भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड येशुलाल उपराडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे, जि प सभापती पूजा सेठ, सीताबाई रहांगडाले यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
फडणवीस पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात २५ कोटी कुटुंबियांना गरिबीच्या दलदलीतून बाहेर काढले. २० कोटी लोकांना पक्की घरे दिली, ५० कोटी कुटुंबांना शौचालय, ५५ कोटी घरात उज्ज्वला गॅस जोडणी पोहचविली, ६० कोटी लोकांच्या घरात नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पोहचविले, ५५ कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजने अंतर्गत आरोग्याचे कवच दिले. पुढील काळात ७० वर्षावरील सर्व नागरिकांना नि:शुल्क उपचार मोदी यांच्या कल्पनेतून साकार योजनेअंतर्गत मिळणार असल्याचे फडणवीसांनी सांगीतले. महिला बचत गटांना कर्ज पुरवठा करून ३१ कोटी महिला आत्मनिर्भर झाल्या, आदिवासींसाठी २४ हजार कोटी, १२ बलुतेदारांना ३० कोटी दिले. बहुजनांच्या उत्थानासाठी ओबीसी आयोग स्थापन केला, त्यांच्या मंत्री मंडळात सर्वाधिक ६० टक्के मंत्री बहुजन असून शेतमालाचा हमी दर वाढविला, समाजातील सर्व घटकांना लाभान्वित केले. ११ व्या स्थानावरील अर्थव्यवस्थेने पाचव्या स्थानी झेप घेतली असून भविष्यात तिसºया क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. स्थानिक मुद्द्यांसंदर्भात ते म्हणाले की डांगोरली बॅरजचे काम लवकर होणार असुन शहराच्या कचºयाच्या बाबतीत डम्पिंग यार्डच्या जमिनीसाठी आचारसंहिता संपल्यानंतर मीटिंग लावणार आहे. तसेच मुंबई-नागपूर-गोंदिया-गडचिरोली समृद्धी मागार्मुळे गोंदियाच्या विकासाला गती मिळेल असा विश्?वास व्यक्त करून गोंदियाकरांच्या हृदयाची चाबी मोदीजींच्या सुपुर्द करण्यासाठी आ. विनोद अग्रवालांच्या आग्रहात्सव गोंदियात आलो असून मोदींचे हात मजबूत करण्यासाठी महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढे यांना निवडून देण्याचे आवाहन फडणवीसांनी यावेळी केले. सभेला महायुतीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. सभेचे संचालन पं स सभापती मुनेश रहांगडाले यांनी केले.