Home गोंदिया जिल्हा कत्तलीसाठी जाणार्‍या जनावरांची सुटका

कत्तलीसाठी जाणार्‍या जनावरांची सुटका

62
0

४.६० लाखाचा मुद्देमाल हस्तगत
गोंदिया :
नवेगावबांध पोलिस ठाण्यातंर्गत नवेगावबांध परिसरातून कत्तलीसाठी वाहनांमध्ये कोंबून जनावरे नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून वाहनाची चौकशी केली असता ४ जनावरे व वाहन पोलिसांनी हस्तगत करून एकूण ४ लाख ६० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई १५ एप्रिल रोजीची आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी होत असते. सध्या निवडणुकीच्या अनुसंगाने पोलिसांकडून पेट्रोलिंग व गस्त सुरू आहे. अशात नवेगावबांध पोलिस ठाण्यातंर्गत राधिका पेट्रोल पंप परिसरातून वाहन क्र.एमएच-४९/एपी-६१४० किंमत ४ लाख मध्ये ४ जनावरे एकूण किंमत ६० हजार नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी वाहन थांबवून जनावरांची सुटका केली. तसेच वाहन ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी एकूण ४ लाख ६० हजार रूपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. फिर्यादी पोहवा राजु मडावी याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.