Home Uncategorized सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार : आमदार अडबाले

सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार : आमदार अडबाले

55
0

सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे निवेदन

गोंदिया : सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी-अधिकार्‍यांच्या अनेक समस्या व प्रश्न कायम आहेत. त्याची आपल्याला जाणीव आहे. यामुळे वरिष्ठांशी संपर्क साधून चर्चा करून समस्या मार्गी लावण्याचे काम प्राधान्याने करणार, असे आश्वासन शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी दिले. सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष एल.यु. खोब्रागडे यांच्या नेतृत्वात आ. अडबाले यांची भेट घेवून समस्यांवर चर्चा केली. यावेळी आश्वासन देताना ते बोलत होते. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले हे 30 मे रोजी माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्था चंद्रपूरच्या गोंदिया शाखेत आले होते. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष एल.यु. खोब्रागडे यांच्या नेतृत्वात आ.अडबाले यांची भेट घेतली. भेटीदरम्यान सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी, कर्मचार्‍यांच्या समस्या आमदारांच्या लक्षात आणून देण्यात आल्या. दरम्यान आ.अडबाले यांनी जि.प.चे मुकाअ, लेखा वित्त अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून प्राधान्याने समस्या सोडविणार असल्याची ग्वाही शिष्टमंडळाला दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एल.यु. खोब्रागडे, टिकाराम भेंडारकर, डी.एल. गुप्ता, मनुताई उके, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष ओ.एस. गुप्ता, संदिप मांढरे, खान आदि उपस्थित होते.