Home Uncategorized आधार संघटना आणि वामा महिला दलाचे न्यायालय परिसरात आंदोलन

आधार संघटना आणि वामा महिला दलाचे न्यायालय परिसरात आंदोलन

37
0

न्यायालय व प्रशासकीय इमारत परिसरात शौचालय देण्याची मागणी

गोंदिया : गोंंदिया शहर मोठी बाजारपेठ असून याठिकाणी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून नागरिकांची मोठ्याप्रमाणात ये जा असते. त्यातच जयस्तंभ चौक असलेल्या परिसरात न्यायालय व प्रशासकीय इमारत असलेल्या भागातील रस्त्यावरच महिला पुरुषांना उघड्यावर लघुशंका करण्याची वेळ येत असल्याचे यापुर्वी सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सविता बेदरकर यांनी लक्ष वेधले होते. सोमवारला १२ आँगस्ट रोजी आधार महिला शक्ति संघटना व वामा महिला सुरक्षा दलाच्यावतीने न्यायालय परिसरातील रस्त्यावर आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. तसेच प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या शौचालयाची दारे बाहेरच्या भागात उघडण्याची मागणी करण्यात आली.या संदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी,मुख्याधिकारी नगरपरिषद व पोलीस निरिक्षकांना देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी नगरसेविका भावना कदम यांनी केले. यावेळी पुजा तिवारी, एड. मेघा राहंगडाले, एड. दर्शाना रामटेके, शिल्पा पटले, सरोज पांडे, रसिका पटोले, सारिका सोनी, रंजीता कनौजिया, भाविका जैन, हेमलता पटोले, रंजना मेश्राम, पूजा जायसवाल, गौरी शर्मा, वैशाली चंदेल, रितु मंडल, चंदा मिश्रा, रमा मिश्रा, संगीता बेलगे, कौशल्या खदवानी, विजेता बहेकर सह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.