Home Uncategorized बांग्लादेशातील हिंदूंना न्याय व सुरक्षितता मिळावी

बांग्लादेशातील हिंदूंना न्याय व सुरक्षितता मिळावी

90
0

शहर भाजपाची पंतप्रधानांना मागणी

गोंदिया : बांग्लादेशातील परिस्थिती पाहता तेथील हिंदू समाजाला न्याय व सुरक्षितता मिळावी, अशी मागणी शहर भाजपच्या वतीने निवेदनातून करण्यात आली. मागणीचे निवेदन आज, 9 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व संबंधितांना पाठविण्यात आले. निवेदनानुसार, बांग्लादेशातील हिंदू समाजाची मंदिरे, घरे व मालमत्तांवर सातत्याने हल्ले होत आहेत. हिंदू महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनाही वाढत आहेत. या अत्याचारांमुळे हिंदू समाजातील लोकांना भीती व असुरक्षिततेच्या वातावरणात जगावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदू समाजाच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंचांवर या गंभीर विषयावर आवाज उठवावा. तसेच बांग्लादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने ठोस आणि प्रभावी पावले उचलावीत. भारत आणि बांग्लादेश यांच्यात मजबूत संबंध असूनही तेथील स्थिती लक्षात घेता तेथील हिंदू समाजाची उपेक्षा होऊ नये आणि त्यांचे प्रश्‍न लवकर सोडवले जावेत, यासाठी तेथील हिंदू समाजातील लोकांना न्याय व सुरक्षितता मिळावी, यासाठी सरकारने त्वरित व ठोस हस्तक्षेप करावा, अशी मागणी शहर भाजपने केली आहे. या निवेदनाची प्रत गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनाही पाठवण्यात आली आहे. निवेदन देताना आमदार विजय रहांगडाले, जिल्हा परिषद सभापती संजय टेंभरे, गोंदिया विधानसभा संयोजक दिनेश दादरीवाल, जिल्हा महामंत्री सुनील केळनका, जयंत शुक्ला, शहराध्यक्ष अमित झा, गजेंद्र फुंडे, आशिष बारेवार, विनोद (गुड्डू) चंदवानी, राकेश अग्रवाल, बाबा बिसेन, महेंद्र सहारे, लोकेश उपराडे, नीरज संगतानी, संजय बैस आदी उपस्थित होते.