देवरीचे उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
देवरी, (गोंदिया) : महाविकास आघाडी घटक पक्ष तालुका देवरी यांच्या वतीने ठाणे जिल्यातील बदलापूर येथील पीडितावरील अत्याचार करणाऱ्या विरोधात कडक कार्यवाही करा. तसेच या घटनेचा निषेध करीत निवेदन देवरीचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सादर केले. निवेदन सादर करणा-या शिष्टमंडळात देवरी तालुका कांग्रेस कमेटी तथा गटनेते जि. प. गोंदिया चे संदीप भाटीया, माजी अध्यक्ष देवरी तालुका कांग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष राधेशाम बगडिया, जि.प.सदस्या तथा गोंदिया जिल्हा महिला कांग्रेसच्या माजी अध्यक्ष उषा शहारे, उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे देवरी तालुकाप्रमुख सुनिल मिश्रा, शहर प्रमुख राजा भाटिया, उपतालुकाप्रमुख सुहाग गिरी, कांग्रेसचे शहर अध्यक्ष कुलदीप गुप्ता, जि. प.सदस्य राधिकाताई धरमगुडे, पं.स.सदस्य प्रल्हाद सलामे, रंजित कासम, भारती सलामे, अनुसया सलामे, नगरसेवक शकिल कुरेशी, विधानसभेचे युवक कांग्रेस अध्यक्ष दिपक(राजा) सहषराम कोरोटे, कांग्रेसचे गोंदिया जिल्हा महासचिव बळीराम कोटवार, माजी शहर अध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, युवक कांग्रेसचे तालुकाध्यक्ष कमलेश नंदेश्वर, अकबर अली सय्यद, जिवन सलामे, मतीन पठाण, माजी जि. प. सदस्य दिपक पवार, ओमराज बहेकार, द्वारकाप्रसाद धरमगुडे, अविनाशजी टेंभरे, अमित तरजुले, संजय बडगे, राजेश गहाने, अंतरीक्ष बहेकार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हासचिव बिसराम सलामे, शार्दूल संगिडवार, जैपाल प्रधान, सुभाष मेळे, नरेश राऊत, कैलास घासले, योगेश साखरे, कलिराम किरसान, भीमराव नंदेश्वर व आकेश उईके यांच्यासह तालुक्यातील महाविकास आघाडी घटक पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश होता.

