सडक अर्जुनी, (गोंदिया) : श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा पळसगाव/ सोनका, तालुका साकोली जिल्हा भंडाराच्या वतीने 9 जून रोजी सडक अर्जुनी येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये श्री गुरुदेव सुसंस्कार गुरुकुल प्रकल्पाची नव्याने उभारणी करण्याकरिता विश्वस्त व्यक्तींची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत चर्चा करून मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. आढावा बैठकीत ग्रामीण भागातील विद्यार्थी हा ग्रामगीतेच्या तत्त्वप्रणालीवरून आदर्श विद्यार्थी बनावा, सुसंस्कारीत विद्यार्थी बनवा आणि आदर्श माणूस बनावा या संकल्पना आणि उद्दिष्ट पुढे ठेवून श्री गुरुदेव सुसंस्कार गुरुकुल प्रकल्प गोंदिया जिल्ह्यात सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमतून गावे जागृत होतील, गावांमधील एकनिष्ठता, अखंडता वाढेल, गाव आदर्श वाटचालीकडे जातील आणि गावावरून आपल्या देशाचे भवितव्य उज्वल होईल.आदी सर्व गोष्टींचे अवलोकन करून ही आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकमध्ये शाखा सेवा मंडळाचे संचालक समीर कोरे यांनी प्रकल्प संदर्भात विस्तृत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सडक अर्जुनी तालुक्यातील सहा गावात लवकरच सुरुवात होणार असून 240 विद्यार्थ्यांना मानवतावादी विचाराचे धडे देण्यात येणार आहेत. सोबतच दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये 15 दिवसीय सुसंस्कृत शिबिराच्या माध्यमातून एक मॉडेल तयार करण्यात येणार आहे.या प्रकल्पाची आढावा बैठकीला निखिल बनसोड, डोलारे, कुलदीप दादा लांजेवार , मधुसूदन दोनोडे, श्री मेश्राम ,श्री गिरीपुंजे,हेमलताताई मांडवटकर, म्हसवाणीचे सरपंच रहांगडाले, सुधीर शिवणकर, राजेश मेश्राम, आशुतोषदादा कोरे, मुक्ताबाई हत्तीमारे आदी उपस्थित होते. यावेळी प्रकल्पाचे अधिकारी समीर कोरे, अर्पण गुप्ता, जय खंदाडे, स्वानंद संगीत अकादमीचे संचालक रोहित तरोणे, निशांत भेंडारकर, योगेश मेंढे, कोरे यांनी बैठकीसाठी सहकार्य केले..

