Home Uncategorized शेतीची कामे मग्रारोहयोतंर्गत करा : धनंजय रिनायत

शेतीची कामे मग्रारोहयोतंर्गत करा : धनंजय रिनायत

40
0

गोंदिया : शेती व्यवसाय तोट्याचा होत चालला आहे. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी, अशी स्थिती शेतकर्‍यांची झाली. यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे. तर दुसरीकडे शेतीच्या हंगामात शेती कामे करण्यास मजुरांचा तुटवडा निर्माण होत असतो. यामुळे शेतीची कामे मग्रारोहयो अंतर्गत करण्यात यावी, अशी मागणी भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री धनंजय रिनायत यांनी केली आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ग्रामीण भागासाठी वरदान ठरली आहे. या योजनेतंर्गत विविध कामे केली जातात. यामुळे मजुरांना काम उपलब्ध होत असते. त्यामुळे मग्रारोहयोत शेती कामांचाही समावेश करण्यात यावा, जेणेकरून शेतकर्‍यांना फायदा होणार. आजघडीला शेती व्यवसायाची अवस्था चिंताजनक आहे. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी नुकसान सोसूनही शेती करीत आहेत. अशात शासनाने पीएम किसान योजनेची अंमलबजावणी करून वार्षिक ६ हजार रूपये शेतकर्‍यांना देत असते. यामुळे शेतकर्‍यांना फार आधार झाला आहे. या पैशातून अनेक शेतकरी बी-बियाणे व खताची जुळवाजुळव करीत असतात. त्यामुळे धाण रोवणीपासुन ते कापनी पर्यत शेतीचे कामे रोजगार हमी योजनेतंर्गत करण्यात यावी, अशी मागणी भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री धनंजय रिनायत यांनी केली आहे.