सुनिल मेंढे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्य.

नागझिरा अभयारन्य क्षेत्राअंतर्गत समविष्ट असलेल्या आदिवासी खेडे गावात पुण्याचे दांपत्य श्री.किरण पुरंदरे व सौ. अनघा पुरंदरे आदिवासी महिलांच्या सशक्तीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करतात. या प्रयत्नाला जोड म्हणून सौ. शुभांगी सुनील मेंढे यांनी संचलित केलेल्या तेजोनिधी फाउंडेशन व बाबुराव मेंढे प्रतिष्ठान अंतर्गत सिलाई मशीन सस्नेह भेट देण्यात आल्या. महिलांना वर्षभर स्वयं रोजगार मिळावा व त्यांचे सशक्तीकरण व्हावे या उद्देशाने माजी खासदार श्री सुनिल मेंढे यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून मेंढे कुटुंबीयांनी हे सामाजिक कार्य संपन्न केले. तसेच हेडगेवार रक्तपेढी नागपूर व मा. खासदार सुनिल मेंढे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन भंडारा येथील ग्रामदैवत बहिरंगेश्वर मंदिरात करण्यात आले. या उपक्रमास भाजयुमो च्या व महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. वाढदिवसाचा कार्यक्रम सामाजिक कार्याने संपन्न केल्यामुळे शहरात व आदिवासी क्षेत्रात देखील चर्चेचा विषय झालेला आहे.
