गोंदिया, दि.15 : जिल्हा कोषागार कार्यालय, गोंदिया यांच्या वतीने दि.22 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत कार्यशाळा तथा पेंशन अदालतीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह, गोंदिया येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये आहरण व संवितरण अधिकारी (DDOs) यांचेसाठी E-PPO, E-CPO, E-GPO तसेच E-REVISION PENSION CASES (सुधारित प्राधिकारपत्र) हे विषय घेण्यात येतील. पेंशन अदालतीत निवृत्तीवेतन धारकांसाठी पेंशनर समाधान तसेच निवृत्तीवेतनधारक यांच्या समस्यांचे निराकरण कोषागार अधिकारी, कोषागार कार्यालय गोंदिया यांचेकडून करण्यात येईल. तरी निवृत्तीवेतन धारकांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी व अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन), गोंदिया यांनी केले आहे.
