Home Uncategorized शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर भर द्यावा : आ.रहांगडाले

शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर भर द्यावा : आ.रहांगडाले

85
0

तिरोडा, (गोंदिया) : जि.प. शाळेतील शिक्षक हे अनुभवी असून विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या अध्ययनावर भर देण्यात येते. त्यामाध्यातून वातावरण निर्मिती होत असते. राष्ट्रनिर्माण करण्याकरिता शिक्षकाची महत्वाची भूमिका आहे व आजही समाजात शिक्षकाचे महत्वाचे स्थान आहे. जि.प. शाळेच्या शिक्षणावर भर देत होतकरु व गरीब विद्यार्थ्याची गुणवत्ता हि शिक्षकावर अवलंबून असते. तेव्हा शिक्षकांनी यावर भर द्यावा, असे प्रतिपादन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी केले. जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत पंचायत समिती शिक्षण विभाग तिरोडातर्फे शाम मंगलम लान तिरोडा येथे शाळापूर्व तय्यारी सविचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रामुख्याने प.स. सभापती कुंता पटले, उपसभापती हुपराज जमाईवार, प.स. सदस्य डॉ. चेतलाल भगत, गटविकास अधिकारी विनोद चौधरी, संचालक मुकेश अग्रवाल व सर्व केंद्राचे केंद्र प्रमुख, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. यावेळी जि.प. शाळेतून प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्याचा आमदार यांच्या हस्ते सत्कार सुद्धा करण्यात आला.