Home गोंदिया जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

52
0

गोंदिया : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानथंम यांनी दुपारी २.०० वाजता सालेकसा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सातगावला आकस्मिक भेट देवुन आरोग्य संस्थेत देत असलेल्या आरोग्य सेवा व सुविधाची पाहणी केली.
भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राची ईमारत जीर्ण झाली असुन अश्या परिस्थितही रुग्णांना बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) दरम्यानच्या वेळेत मिळत असलेल्या रुग्ण सुविधा बद्दल समाधान व्यक्त केले. वैद्यकिय अधिकारी यांना आरोग्य संस्थेचा कारभार दुसर्या चांगल्या रुममध्ये स्थांनातरण करण्याच्या सुचना केल्या. जोपर्यंत नविन आरोग्य संस्थेचे बांधकाम होत नाही तोपर्यंत उपलब्ध रुममध्ये लोकांना आरोग्य सेवा देण्याबाबत सुचित केले. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानथंम यांनी बाह्यरुग्ण सेवेत असलेल्या आरोग्य सेविका विणा बिसेन यांचे मार्फत आपला स्व:ताचा रक्तदाब तपासणी करुन घेतला.भेटी दरम्यान बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) तपासणी रजिष्टरची तपासणी करुन स्वाक्षरी केली.
भेटि दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र सातगावचे वैद्यकिय अधिकारी डॉ.पल्लवी रामटेके, दुसरे वैद्यकिय अधिकारी डॉ.किरण बाहेती, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रदिप गिल्ले, आरोग्य सेविका विणा बिसेन, परिचर लटये व कनिष्ठ सहाय्यक ई.उपस्थित होते.