Home गोंदिया जिल्हा लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी प्रजित नायर

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी प्रजित नायर

64
0
Oplus_131072


निवडणूक प्रचाराची वेळ आजपासून समाप्त
गोंदिया
: भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. सदर निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उपविभागीय अधिकारी कार्यालय पत्र परिषदे घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी नायर यांनी १९ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही दिली. जिल्ह्यात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी यंत्रणा प्रयत्न करीत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उष्णतेची तीव्रता लक्षात घेता उष्माघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आरोग्य विभागामार्फत मेडिकल कीटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान केंद्रावर ५ हजार ७१६ अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर निवडणुकीत नियुक्त मतदान पथकांना मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी व परत आणण्याकरीता १८१ बसेस व २४१ जिपची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दिनांक १७, १८ व १९ एप्रिल रोजी ड्राय डे म्हणून पाळण्यात यावा. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंध करण्यात आले आहे. कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्रावर मोबाईल सोबत बाळगता येणार आहे. रात्री १० वाजेनंतर स्पीकर वाजविण्यावर बंदी असणार आहे. नागरिकांनी कुठल्याही प्रकारची अफवा पसरवू नये. सुजान नागरिकांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितले.