गोंदिया, दि.6 : बँक ऑफ इंडिया (आरसेटी) स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेद्वारे बेरोजगार 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींकरीता ‘फास्ट फुड स्टॉल उदयमी’ या व्यवसायाचे 12 दिवसीय मोफत प्रशिक्षण संभाव्य 13 मे 2025 पासून सुरु होणार आहे. या प्रशिक्षणात चायनीज फुड, पिझ्झा, बर्गर, मोमोस, कुकीस, डोणट, समोसा, कचोरी तसेच वेगवेगळे शितपेय (ज्यूस) बनवायला शिकवतील पण यासाठी आरसेटीला कोर्स सुरु करण्याकरीता कमीत कमी 30 ते 35 उमेदवारांची आवश्यकता असते. या संस्थेमध्ये विविध प्रकारचे कोर्स नि:शुल्क असून राहण्याची व जेवणाची नि:शुल्क सोय प्रशिक्षण संस्थेतच करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील बेरोजगारांनी या संधीचा लाभ घ्यावा व तांत्रिक प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार करावा. ग्रामीण भागातील बेरोजगारांना प्राधान्य देण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, वाहने पॅलेस, हरिणखेडे पेट्रोलपंप जवळ, तिरोडा रोड, कुडवा (गोंदिया) येथे त्वरित जमा करावे. अधिक माहितीसाठी 07182-252007/ 8698140105 यावर संपर्क साधावा, असे संस्थेचे निदेशक अब्दुल वसीम यांनी कळविले आहे.
