Home Uncategorized पावसामुळे घोटी येथील सहा घरे जमीनदोस्त

पावसामुळे घोटी येथील सहा घरे जमीनदोस्त

78
0

गोरेगाव, (गोंदिया) : सतत पावसामुळे तालुक्याच्या घोटी येथील सहा जणांचे जीर्ण झालेले माती व कौलारू घरे गुरुवारच्या रात्री जमीनदोस्त झाले. तथापि, संबंधित कुटुंबांना राहण्यायोग्य घर नसल्याने त्यांना घरकुल देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.घोटा ग्रामपंचायतीमध्ये घोटी, गहेलाटोला, जानाटोला या गावांचा समावेश आहे. लोकसंख्या चार हजाररांपेक्षा जास्त आहे. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळणार या आशेने अनेकांनी घर दुरुस्ती केली नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांची घरे जीर्ण अवस्थेत आहेत. यात इक्बाल शेख, दामोदर रहांगडाले, सुरेंद्र रहांगडाले, सुखराम रहांगडाले, राजोवा वाघाडे, लालचंद राऊत, अशोक गैरवार, शामलाल बोरसरे, केशरबाई बिसेन, कविता रहांगडाले यांची घरे जीर्ण आहेत. त्यापैकी गुरुवारी रात्री आलेल्या पावसामुळे इक्बाल शेख, दामोदर रहांगडाले, सुरेंद्र रहांगडाले, राजोबा वाघाडे, लालचंद राऊत, अशोक गैरवार यांची घरे जमीनदोस्त झाले आहेत. ही घरे अतिजीर्ण होती. ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र रहांगडाले व कोमल गि-हेपुंजे यांनी संबंधित कुटुंबांची पर्यायी व्यवस्था केली असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती नरेंद्र रहांगडाले यांनी तहसीलदारांना देऊन तत्काळ पंचनामा करण्याची विनंती केली. तलाठी डहाट, कोतवाल संजय धानगाये यांनी घराचे पंचनामे केले. शासनाने तत्काळ घरकुल द्यावे, अशी मागणी पीडित लाभार्थ्यांनी केली आहे.