Home Uncategorized केंद्रीय अर्थसंकल्प विकसीत भारताची पायाभरणी : शिवाणी दानी

केंद्रीय अर्थसंकल्प विकसीत भारताची पायाभरणी : शिवाणी दानी

83
0

गोंदिया : केंद्रीय अर्थसंकल्प वित्तमंत्री निर्मला सितारमन यांनी 23 जुलै रोजी सादर केला. हा अर्थसंकल्प अनेक अर्थाने महत्वाचा असून यात स्वयंपूर्णतेवर भर देण्यात आला आहे. 2047 पर्यंत भारताला विकसीत राष्ट्र बनविण्याची ही पायाभरणी असल्याचे प्रतिपादन भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवाणी दानी यांनी केले.

त्या भाजपतर्फे 1 ऑगस्ट रोजी राईस मिलर्स असोसिएशनच्या सभागृहात आयोजित प्रबुद्ध नागरिक संमेलनात बोलत होत्या. यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. येसूलाल उपराडे, भंडारा-गोंदिया जिल्हा समन्वयक विरेंद्र अंजनकर, माजी जिप अध्यक्ष नेतराम कटरे, महिला मोर्चा प्रदेश महामंत्री रचनाताई गहाणे, प्रबुद्ध नागरिक कार्यक्रमाचे संयोजक डॉ. प्रशांत कटरे, जिल्हा उपाध्यक्ष सीए दिनेश दादरीवाल आदी उपस्थित होते. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, रोजगार, कौशल्य, उद्योग, गरीब कल्याण व मध्यम वर्ग या विषयावर अर्थसंकल्प केंद्रीत केला गेला आहे. यात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास हे सरकारचे महत्वाचे प्राधान्य आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून भारताला विश्‍वगुरु बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासरुपी वाटचाल सुरु आहे. ज्यावेळी काँग्रेसचे माजी वित्तमंत्री चिदंमबरम मोदींच्या डिजीटल क्रांतीवर हसत होते, याचा अर्थ त्यांनी मागील साठ वर्षात काहीच केले नसल्याची ती पावती होती. मात्र, जनधन सारख्या योजनेतून कोट्यवधी लोकांचे खाते उघडून डिजीटल पेमेंट सोपे करुन संपूर्ण जगाला बदल दाखवून दिला. विशेषतः कोरोना काळात याचे विशेष महत्व कळले. अनेक उदाहरण देवून दानी यांनी, केंद्रीय अर्थसंकल्पाचे बारकावे यावेळी समजावून सांगितले. याप्रसंगी सीए दादरीवाल यांनी, कर प्रणालीमध्ये झालेल्या बदलाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. प्रशांत कटरे यांनी मांडताना समाजातील महत्वाच्या घटक असलेल्या प्रबुद्ध नागरिकांशी सरकारचे व्हिजन स्पष्ट करण्यासाठी व विरोधक पसरवित असलेल्या चुकीच्या गोष्टीला उत्तर देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन जयंत शुक्ला यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील चार्टर्ड अकाऊंटंट संघटना, डॉक्टर्स संघटना, वकील संघटना, शिक्षक संघटना, शेतकरी व सहकार संघटना, व्यापारी संघटना, अभियंता संघटना, सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना आदी संघटनांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.