सडक अर्जुनी, (गोंदिया) : सडक अर्जुनी तालुक्यातील शशीकरण बाबा देवस्थान ते शिवमंदिर उकारा पर्यंत 108 महिला भगिनींची भव्य कावड यात्रेचे आयोजन सोमवार, 5 ऑगस्ट 2024 ला करण्यात आले आहे. गोंदिया जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात तालुका महिला काँग्रेस कमिटी, सडक अर्जुनी, अर्जुनी मोर व गोरेगावच्या वतीने भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कावड यात्रेमध्ये प्रामुख्याने गोंदिया जिल्हा महिला काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष वंदना काळे व भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर तसेच गायत्री इरले, पुष्पा खोटोले, डॉ. रीता लांजेवार, लता गहाणे सरपंच फुटाळा, शिला उईके, भुमेश्वरी रहांगडाले उपस्थित राहणार आहेत. तरी कावड यात्रेमध्ये जास्तीत जास्त संख्येने महिला भगिनींनी सहभागी होण्याचे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण हटवार यांनी केले आहे.
