Home गुन्हेवार्ता धोकादायक आरोपी वर्षभरासाठी नागपूर कारागृहात

धोकादायक आरोपी वर्षभरासाठी नागपूर कारागृहात

77
0

एमपीडीए अंतर्गत कारवाई
गोंदिया :
रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत एका धोकादायक आरोपीला जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या ८ एप्रिलच्या आदेशान्वये एमपीडीए अंतर्गत वर्षभरासाठी नागपूर येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आदेश अरविंद रामटेके (२२) रा. गिरोला असे आरोपीचे नाव आहे.
सविस्तर असे की, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यांतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था भंग करणाºया गुन्हेगारांवर आणि वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी धोकादायक गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगार व्यक्तीवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. रावणवाडी हद्दीतील धोकादायक गुंड आदेश अरविंद रामटेके याचेविरुद्ध एमपीडीए कायद्यानुसार प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे मार्फतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याची सहनिशा करून जिल्हाधिकारी यांनी ८ एप्रिल रोजी आरोपीला वर्षभरासाठी नागपूर कारागृहात पाठविण्याचे निर्देश देण्यात आले. त्या अनुषंगाने ९ एप्रिल रोजी आरोपी रामटेके याला नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे.