Home Uncategorized छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त 19 फेब्रुवारीला भव्य पदयात्रेचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त 19 फेब्रुवारीला भव्य पदयात्रेचे आयोजन

31
0

गोंदिया, दि.14 : भारत सरकार, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, युवा कार्यक्रम विभाग यांच्या निर्देशान्वये छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती 19 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये ‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘जय शिवाजी-जय भारत’ ही पदयात्रा असून यामध्ये औद्योगिक प्रतिष्ठाने, महाविद्यालये, नवउद्योजक, शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक वारसा जतन करणाऱ्या बाबी यांचे प्रदर्शन होणार आहे. सदर पदयात्रा ही 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता शिवाजी पुतळा, मनोहर चौक, गोंदिया येथून सुरु होणार असून इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे संपन्न होणार आहे.

          जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, एन.एस.एस., एन.वाय.के. संस्था, माय भारत व्हालंटियर्स, भारत स्काऊट-गाईड पथक, लेझीम पथक, एन.सी.सी. पथक, एन.एस.एस. पथक यांच्यासह अंदाजे दीड हजार विद्यार्थ्यांची भव्य दिव्य पदयात्रा शिवाजी पुतळा, मनोहर चौक गोंदिया येथून निघणार असून सदर पदयात्रेची सांगता इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे होणार आहे. या पदयात्रेचे भव्य आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया व जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी कळविले आहे.