■ देवरी येथील छत्रपती शिवाजी संकुलनात कार्यक्रमाचे आयोजन.
देवरी,ता.१६: स्थानिक कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था द्वारा संचालित छत्रपती शिवाजी संकुलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सव सोहळा १९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या जयंती सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून या निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी शनीवार(ता. १५ फेब्रुवारी) रोजी छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसीच्या कॉन्फ्रेंस रूममध्ये पत्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी छत्रपती शिवाजी संकुलमध्ये ‘छत्रपती शिवाजी उत्सव समिती’ च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजतापासून कार्यक्रमाला सुरूवात होणारे आहे. या सोहळ्याचे उद्घाटन या क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते आणि जि. प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.तर कार्यक्रमाचे पूजन व ध्वजारोहण आमदार इंजि. राजकुमार बडोले यांच्या हस्ते
होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून प्रबोधनकार डॉ. प्रशांत महाराज ठाकरे, वीरेंद्र अंजनकर, पं. स. सभापती अनिल बिसेन, नगराध्यक्ष संजू ऊईके, सविता तुरकर, राजकुमार रहांगडाले, सुनंदा भुरे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी छत्रपती शिवाजी संकुलमध्ये शिक्षण घेत असलेल्या छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर, छत्रपती शिवाजी हायस्कूल, सी. एस. इंग्लिश पब्लिक स्कूल, संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या दोन्ही आश्रमशाळा आ असे ५ विभागातील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ज्युनिअर कॉलेज, फार्मसी कॉलेज व
पॉलिटेक्निक कॉलेजच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या परिवारावर आधारित फॅशन शो चे आयोजन होणार आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे इयत्ता दहावी व बारावी महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या परीक्षेत व सीबीएसई दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांचां त्यांच्या पालकासह स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
या पत्र परिषदेला कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्थेचे सचिव अनिलकुमार येरणे, कोषाध्यक्ष जयश्रीताई येरणे, छत्रपती शिवाजी संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य व मुख्याध्यापक व प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी उपस्थित होते.#
(टिप :- या बातमी सोबत या पत्र परिषदेत उपस्थित अनिलकुमार येरणे,जयश्रीताई येरणे व इतर प्राचार्य यांची फोटो पाठविली आहे.)

