गोंदिया : जिल्ह्यात खरीप व रब्बी या दोन हंगामात धान पिकांचे उत्पादन घेण्यात येते. यंदाच्या हंगामात सुमारे ७० हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. हे धान फुटण्याच्या स्थितीत असून मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी या वातावरणाने धान पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी असल्या तरी अनेक शेतकरी विंधन विहिरीच्या माध्यमातून रब्बी हंगामात धान पिकाची लागवड करतात. शिवाय दुसरीकडे जिल्ह्यात असलेल्या तलावांच्या माध्यमातून होत असलेल्या सिंचनाद्वारे अनेक शेतकरी रब्बीतील धान पिकाची लागवड करतात. जिल्ह्यात खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात नैसर्गिक आपत्तीचा सामना शेतकºयांना करावा लागतो. सद्या रब्बी हंगामातील धान भरात आला आहे. तर पुर्वी लागवड झालेला धान फुटू लागला आहे. मात्र दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणाचा फटका धान पिकावर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वातावरणात बदल झाल्याने किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्हा कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांसाठी रब्बी हंगामात कोणत्याही ठोस उपाययोजना नसल्याने शेतकºयांना या बदललेल्या वातावरणाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
बळीराजाकडे दुर्लक्ष
सद्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणाही निवडणुकीच्या कामाला लागली आहे. त्यातच रब्बी हंगामात शेतकºयांवर येणाºया संकटाचा सामना शेतकºयांनाच करावा लागत आहे. लोकप्रतिनिधीही शेतकºयांच्या नावावर राजकारण करीत असले तरी रब्बी हंगामातील शेतकºयांकडून कैवाºयांचेही दुर्लक्ष झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.




