तिरोडा : लोकसभा निवडणुकीचे प्रचार अभियान जोमात सुरू आहे. दरम्यान उमेदवार व त्यांचे समर्थक पुढारी सभेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत आहेत. मात्र प्रचारसभेच्या माध्यमातून विज चोरी सुरू आहे, याचे प्रत्यक्ष अनुभव अर्जुनी येथील नागरिकांनी घेतले. महायुतीतर्पेष्ठ आयोजित प्रचारसभेसाठी थेट आकडा टाकून विज पुरवठा करुन घेण्यात आला होता. विशेष म्हणजे, रस्त्यावर विद्युत तार पसरविण्यात आले होते. त्यामुळे पुढाºयांच्या सभेला घेवून ‘दिव्याखाली अंधार’ अशी चर्चा सुरू झाली आहे.
अलीकडे महावितरण कंपनीकडून विज चोरी करणाºयांवर कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे सर्रासपणे प्रचारसभेसाठी अर्जुनी येथे आकडा टाकून विज पुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे आता काय महावितरण कंपनीचे कर्मचारी झोपेत आहेत का? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ७ एप्रिल रोजी अर्जुनी येथील बाजार चौकात सायंकाळी ७ वाजता सुमारास महायुतीच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत खा.प्रफुल पटेल व आ.विजय रहांगडाले यांची उपस्थिती होती. या सभेसाठी आकडा टाकून विज पुरवठा करण्यात आला होता. तेही रस्त्यावर तार पसरविण्यात आले होते. त्यामुळे विज चोरी अन्न महायुतीची प्रचारसभा परिसरात चांगलीच चर्चेत आली आहे.




