अर्जुनी मोरगाव, (गोंदिया) : अर्जुनी मोर तालुक्यातील इसापूर येथे 26 ऑगस्ट रोजी जन सुविधा योजना अंतर्गत संतोष रोकडे यांच्या घरापासून तलावापर्यंत रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य पौर्णिमा ढेंगे, उपाध्यक्ष माजी जिल्हा परिषद सभापती उमाकांत ढेंगे तर अध्यक्षस्थानी इसापूर ग्रामपंचायत सरपंच सरस्वताताई वलथरे होते. सह उद्घाटक म्हणून पंचायत समिती सदस्य भाग्यश्री सयाम, उपसरपंच दिलीप सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य नलिनी चांदेवार, ग्रामसेवक समीर रामटेके, ग्राम रोजगार सेवक संतोस रोकडे, माजी सरपंच राजकन्या लांजेवार, मेघा ढेंगे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष देवराम रोकडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

