Home Uncategorized उज्वल मेश्राम खून प्रकरणात लोकेश यादवला अटक

उज्वल मेश्राम खून प्रकरणात लोकेश यादवला अटक

210
0

गोंदिया : शहरातील कुंभारेनगर अंबेडकर भवन येथील उज्वल उर्फ दद्दू निशांत मेश्राम खून प्रकरणात माजी नगरसेवक लोकेश यादवला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. सविस्तर असे की गोंदिया शहर पोलीस ठाणे अंतर्गत कुंभारेनगर अंबेडकर भवन गोंदिया येथे 18 जून 2024 च्या रात्री 9.50 वाजता दरम्यान उज्वल उर्फ दद्दू निशांत मेश्राम याचा खून करण्यात आलेला होता. सदर प्रकरणी पो. ठाणे गोंदिया शहर येथे अपराध क्रमांक 392/2024 कलम 302, 120, ब भादवी, सहकलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये दाखल असून गुन्ह्यात यापूर्वी आतापर्यंत 7 आरोपितांना अटक करण्यात आली आहे. य़ा प्ररकरणात मृतकाच्या आईने माजी नगरसेवक कल्लू उर्फ लोकेश यादववर आरोप करीत अटकेच्या मागणीला घेऊन मोर्चा पण काढला होता. त्यानंतर पोलिसांनी सदर गुन्ह्यात लोकेश उर्फ कल्लू सुंदरलाल यादव (वय 42, रा. यादव चौक गोंदिया)ला रविवार, 7 जुलै रोजी सायंकाळी 7.39 वाजता अटक केली. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर करीत आहेत.