Home गुन्हेवार्ता जंगल शिवारातील दारुभट्टी उधळली

जंगल शिवारातील दारुभट्टी उधळली

66
0
Oplus_131072


दोन धाड कारवाई ६४० किलो सडवा मोहफुल जप्त
गोंदिया :
नजिकच्या पांगडी व चुटिया जंगल शिवारात हातभट्टी दारू गाढली जात आहे. या खात्रीशीर माहितीच्या आधारावर पोलिसांनी धाड कारवाई करीत भट्टी उधळून काढली. दरम्यान घटना स्थळावरून ६४० किलो मोहफूल व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी वन व पोलिस विभागाकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पांगडी वन क्षेत्रांतर्गत दारू गाढली जातक आहे. अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत उपवन संरक्षक प्रमोदकुमार पंचभाई यांना माहिती देण्यात आली. दरम्यान पोलिस व वन विभागाच्या वतीने संयुक्त धाड कारवाई करण्यात आली. पांगडी बिट कक्ष क्र. २४०३ या संरक्षित वन क्षेत्रात सुरू असलेली दारू भट्टी उधळून काढली. त्याच प्रमाणे चुटिया बिट कक्ष क्र. ३८७ वन क्षेत्रात सुरू असलेली दारू भट्टीही उधळण्यात आली. दोन्ही ठिकाणाहून ६४० किलो सडवा मोहफूल व इतर साहित्य जप्त करण्यात आला.या प्रकरणी वन विभागासह पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.