८१ जोडपी होणार विवाहबद्ध
गोरेगाव : तालुक्यातील सुर्यादेव मांडोदवी देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमीच्या पर्वावर १६ एप्रिल रोजी सर्वधर्म सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विवाहसोहळ्यात ८१ जोडपी विवाहबध्द होणार आहे. यासाठी ७१ जोडप्यांनी नोंदणी केली आहे. सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबध्द होणाºया जोडप्यांना शासनाच्या शुभमंगल योजनेचा लाभ मिळणार आहे.तर समितीकडून जीवनोपयोगी साहित्य व भेटवस्तू दिले जाणार आहे. देवस्थान समितीतर्फे आयोजित विवाह सोहळ्याचे हे ३२ वे वर्ष आहे. सामुहिक सोहळ्यात विवाहबध्द होण्यासाठी नोंदणी करावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
……………
वेळ व पैशाची बचत
सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजनातून वेळ व पैसाची बचत होत असते. यासाठी अनेक जोडपे नोंदणी करून सामुहिक विवाह सोहळ्यात लग्नगाठ बांधत असतात. सुर्यादेव मांडोदेवी देवस्थान समितीच्या वतीने विवाह सोहळा १६ एप्रिल रोजी आयोजित असून नोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, सचिव डॉ.लक्ष्मण भगत, भैय्यालाल सिंदराम, विश्वनाथ असाटी, कुसन घासले, डॉ.जितेंद्र मेंढे, शालिकराम ऊईके, सखाराम सिंदराम, दिलीप खंडेलवाल, राहुल अग्रवाल व मंदिर समितीचे पदाधिकाºयांनी केले आहे.




