दि.10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान कचारगड यात्रा संपन्न झाली आहे.सालेकसा तालुक्यात छत्तीसगड,मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या कचारगडला आदिवासी समाजाचे उगम स्थळ मानले जात असून या ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाज श्रद्धेने येऊन नमन करून जातो.आद्य पौर्णिमेनिमित्त आपल्या पूर्वजाला नवस फेडण्यासाठी दरवर्षी येथे सुमारे पाच ते सहा लाख भाविक येत असतात.त्या लाखो भाविकांना सर्व विभागांच्या एकत्रित प्रयत्नाने पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असतात.
यात्रेदरम्यान भाविकांना आरोग्यविषयक सेवा सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा यांचे मार्फत आरोग्याच्या चांगल्या सुविधा प्रदान केल्या जातात.यात्रेच्या पाचही दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा मार्फत आरोग्य प्रदर्शनी व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 12 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी प्रजित नायर व पोलीस अधिक्षक गोरख भांबरे यांनी कचारगड यात्रा व कोपार लिंगो मॉ काली कंकाली देवस्थानी भेट दिली.त्यावेळी त्यांनी आरोग्य कँपला भेट देवुन आरोग्य सुविधाची पाहणी केली त्यावेळी त्यांचे सोबत तहसीलदार नरसह्या कुंडा गोरले,पिपरीया क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य गीताताई लील्हारे,सालेकसा पंचायत समिती सदस्य सुनिताताई राऊत उपस्थित होते.
यात्रेप्रसंगी आरोग्य शिबीराच्या माध्यमातुन किरकोळ आजाराच्या रुग्णांना प्रथमोपचार करण्यात येवुन आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारे राष्ट्रिय आरोग्य कार्यक्रम, विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धि,पाणी शुद्धीकरण,जलस्त्रोतांचे निर्जंतुकीकरण आरोग्य कर्मचार्यामार्फत करण्यात येत आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांच्या मार्गदर्शनानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा येथील वैद्यकिय अधिकारी डॉ.पारस गिरी यांनी यात्रे दरम्यान पाचही दिवस वैद्यकिय टिम यांच्या कामाचे नियोजन,औषधी साठा, आरोग्यविषयक कार्यक्रमे-योजना यांची जनजागृती करुन स्टॉल लावण्यात आला आहे.
यात्रे दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभाकर डोंगरवार,आरोग्य सेविका शिरसागर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी उन्नती उप्पलवार यांचे सह आरोग्य संस्थेतील अन्य समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा सेविका यांनी आरोग्य सेवा प्रदान केली.

