गोंदिया : जिल्ह्यात पॅरामेडिकल क्षेत्रात अग्रणी असलेल्या एम.जी. पॅरामेडिकल महाविद्यालयात स्वातंत्र्य दिवस ध्वजारोहण करून व व्यसनमुक्तीची शपथ घेऊन साजरा कऱण्यात आला. या प्रसंगी कॉलेजचे संस्थापक अनिल गोंडाने, मंसरबाई गोंडाने, संविधान मैत्री संघाचे कार्यवाहक अतुल सतदेवे मंचावर उपस्थीत होते. हर घर संविधान कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालय ते श्रीनगर पर्यंत प्रबोधनात्मक फेरी काढून समाज जागृती करण्यात आली.महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई व महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळ, मुंबईची मान्यता असलेले एम. जी. पॅरामेडिकल काॅलेज नेहमीच विविध सामाजिक कार्य करण्यात अग्रेसर असून मोफत रक्त तपासणी, पथनाट्य, रक्तदान असे नवनवीन उपक्रम राबविले जातात. कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थीनी कु.स्वाती खोटेले व कु.पलक टेंभरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका प्रिती वैद्य यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य अनुसया लिल्हारे, प्रा. प्रीती वैद्य, प्रा. ललीतकुमार डबले, प्रा. रामेष्वरी पटले प्रा. छाया राणा, प्रा. आरती राऊत, प्रा. मनीष चैधरी, प्रा. दुर्गा ठाकरे, प्रा.गायत्री बावनकर, राजु रहांगडाले, सौरभ बघेले, राजा उंदिरवाडे, योगेष्वरी ठवरे व रूपाली धमगाये यांनी सहकार्य केले.

