Home गोंदिया जिल्हा राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण १३७९८ प्रकरणांचा यशस्वी निपटारा

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण १३७९८ प्रकरणांचा यशस्वी निपटारा

4
0

वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचाराने व सामंजस्याने तात्काळ निकाली काढण्याकरीता मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशान्वये मा. श्री. आर. एन. जोशी, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली तसेच मा. श्री. एन. के. वाळके, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली दि. १४ मार्च, २०२६ रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे तसेच जिल्हयातील सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत तालुका न्यायालयांमध्ये तडजोड पात्र न्याय प्रविष्ठ व पूर्व न्याय प्रविष्ठ प्रकरणाकरीता तसेच विद्युत व बँका तसेच लोकोपयोगी पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणांकरीता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. 

मा. श्री. आर. एन. जोशी, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा. श्री. ए. एस. प्रतिनिधी, जिल्हा न्यायधीश – १, गोंदिया, मा. श्री. एम. टी. असीम, जिल्हा न्यायधीश – २, गोंदिया, मा. श्री. के. एन. गौतम, जिल्हा न्यायाधीश – ३, गोंदिया, मा. श्री. ए. सी.  ए. सी. खुराणा, जिल्हा न्यायाधीश– ४, तथा अतिरीक्त सत्र न्यायाधीश, गोंदिया, मा. श्री. डी. व्ही. हरणे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, गोंदिया, मा. श्री. के. एम. जयसिंगानी, मुख्य न्यायदंडाधिकारी, गोंदिया, मा. श्री. एम. जे. मोहोड, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, गोंदिया, मा. श्री. एम. के. सोरते, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, गोंदिया, मा. श्रीमती वाय. के. राऊत, ३रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, गोंदिया, मा. श्री. ए. व्ही. ढोरे, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, गोंदिया, मा. श्रीमती. एस. व्ही. चरडे, ५ वे, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, गोंदिया, मा. श्रीमती टी. व्ही. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, गोंदिया, मा. श्रीमती. एस. ए. शेंडगे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, गोदिया, मा. श्रीमती. के. व्ही. शेंडे, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, गोंदिया, श्री. व्ही. एच. शेंडे, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, गोंदिया व न्यायीक कर्मचारी वृंद, पक्षकार वर्ग, वकील वर्ग यांचे प्रमुख उपस्थितीत लोकन्यायालयाचे उद्घाटन मा. श्री. आर. एन. जोशी, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर मा. श्री. आर. एन. जोशी, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया यांनी लोकअदालतीचे फायदे व महत्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच श्री. एन. के. वाळके, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याचे आवाहन केले. 

सदर लोकअदालतमध्ये ठेवण्यात आलेल्या न्यायालयात प्रलंबीत प्रकरणांपैकी १,८७३ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली व रू. ४०,५९,१५,६७६ /- रूपयांची वसुली झाली. पुर्वन्यायप्रविष्ठ ३०, ५३५ प्रकरणांपैकी ११,९२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली व यामध्ये रू.१,९२,९२,००० /- रूपयांची वसुली झाली. अशाप्रकारे एकुण ३८,३३४ ठेवलेल्या प्रकरणापैकी १३,७९८ प्रकरणे निकाली काढण्यात आली व एकुण रू.४२, ५२,०७,६७६/- (आठ करोड चौतीस लाख चव्वेचाळीस हजार चारशे सव्वीस फक्त) एवढी वसुली झाली. त्याचप्रमाणे स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत जिल्हयातील न्यायालयामध्ये एकूण ३६५ फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी ३२१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामुळे पक्षकार व इतरांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास यामधून सुटका मिळाली. यामुळे ब-याच पक्षकारांनी समाधान व्यक्त केले आहे. या लोक अदालतीची विशेष बाब म्हणजे 

महावितरणचे तसेच विद्युत, पाणी, टेलीफोन, बॅक रीकव्हरी यांचे पूर्वन्यायप्रविष्ठ प्रकरणातील ज्या पक्षकारांनी तडजोडीप्रमाणे थकबाकीची पूर्ण रक्कम संबंधित विभागाला जमा केली त्यांची प्रकरणे कायमची संपवण्यात आली. यामुळे संबंधित विभाग व थकबाकीदारांचा भविष्यातील न्यायालयीन खर्च व मानसिक त्रास वाचला. प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याकरीता गोंदिया येथील मा. मा. श्री. ए. सी. खुराणा, जिल्हा न्यायाधीश – ४, तथा अतिरीक्त सत्र न्यायाधीश, गोंदिया, मा. श्री. डी. व्ही. हरणे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, गोंदिया, मा. श्रीमती वाय. के. राउत, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, गोंदिया, श्रीमती. एस. ए. शेंडगे, २रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, गोंदिया, श्रीमती के. व्ही. शेंडे, ३रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, गोंदिया, श्री. व्ही. एच. शेंडे, ४थे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, गोंदिया, जिल्हा वकील संघ, इतर पदाधिकारी तसेच पॅनलवरील वकील अॅड. रितेश आगासे, अॅड. श्रीमती एकता गणवीर, 
ॲड. श्रीमती रोशनी पटले, ॲड. कु. कंचन ठाकरे, अॅड. कु. पायल बोपचे यांनी सहकार्य 
केले. 

सदर लोकअदालतीचे यशस्वी आयोजनाकरीता श्री. ए. आर. कुकडे, प्रबंधक, जिल्हा न्यायालय, गोंदिया, मा. श्री. एम. पी. पटले, येथील श्री. पी. एन. गजभिये, श्री. आर. ए. सोनकुसरे, कु. पी. डी. जेंगठे, श्री. व्ही. व्ही. जाधव, श्री. एन. सी. शहारे, तसेच श्री. रोहित मेंढे, शिपाई, श्री. एन. बी. बहादुरे, बेलिफ व पॅरा लिगल व्हांलटीअर्स, गोंदिया तसेच इतर न्यायालयीन कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.