गोरेगाव, (गोंदिया) : आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी क्षेत्रातील चिलाटी, तुमखेडा आणि मोहगाव येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना वही वाटप करुन आपला वाढदिवस साजरा केला. पंकज रहांगडाले यांनी सोशल मिडियावर वाढदिवसाच्या दिवशी हार, फुले पुष्पगुच्छ न आणता शालेय साहित्य घेऊन येण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक हितचिंतकांनी त्यांना शालेय साहित्य भेटवस्तू म्हणून दिले ज्याचे वाटप गरजू विद्यार्थ्यांना केले जाणार आहे. आपल्याकडून विद्यार्थ्यांना भेटवस्तू म्हणून पंकज रहांगडाले यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना वही वाटप केले. यावेळी चिलाटी येथील कार्यक्रमात मनोज बोपचे सभापती पं. स. गोरेगाव, रविन्द्र पटले जिल्हाउपाध्यक्ष युवा मोर्चा गोंदिया, फणिंद्र पटले युवा मोर्चा उपाध्यक्ष,नलिनीबाई बिसेन सरपंच चिल्हाटी, धनराज टेंभरे, विलास पटले उपसरपंच चिल्हाटी, मानसिंग ठाकुर, माणिकभाऊ पारधी, विमलाबाई ठाकुर, रमेश सिलेवार, लालचंद चौहान, भूषण ठाकुर, यशवंत ठाकुर, दिलीप बोपचे, सचिव मॅडम तसेच तुमखेडा येथील कार्यक्रमात सरपंच रंजुकुमार पालीकराम येळे, ग्राम पंचायत सचिव योगेश रुद्रकार, माजी सरंपच घनश्यामभाऊ पटले, तंटामुक्ती अध्यक्ष श्डॉ होमेन्द्र रहांगडाले, ग्राम पंचायत सदस्य उमेशकुमार ठाकुर, प्रमेश्वर प्रधान, माजी तं.मु.अध्यक्ष बाबारावजी बन्सोड, माजी त.मु.महेन्द रहांगडाले, माजी ग्राम प.सदस्य मुकेश बेलगे, गिरीश रहांगडाले, सोमेश्वर बोपचे, यशवंत वानखेड़े विजय पटले,सुनील शरणागत, योगेश कुमार शहारे, सर्व आंगनवाड़ी सेविका सर्व महिला बचत गट सी.आर.पी., सर्व आरोग्य सेविका व समस्त गावकरी आणि मोहगाव येथील कार्यक्रमात गेंदलालजी हरिणखेडे, कमलेशजी रहांगडाले, सीताबाई रहांगडाले, गणराजजी पटले, शिक्षक आणि कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

