भारतीय जनता पार्टी द्वारा लाखांदूर येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात माजी खासदार सुनील मेंढे यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण उपक्रमात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. कार्यक्रमादरम्यान पक्षाची विचारधारा, संघटनात्मक बांधणी तसेच समाजाभिमुख कार्यपद्धती यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानववाद या विचारसरणीवर आधारित कार्य करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
माजी खासदार सुनील मेंढे यांनी आपल्या मार्गदर्शनात कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला. त्यांनी संघटन अधिक मजबूत करण्यासाठी समर्पण, शिस्त आणि सातत्यपूर्ण कार्य यांचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यात कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले. तसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या जनकल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यात आले.
हा प्रशिक्षण उपक्रम कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला असून, भविष्यात पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे, जिल्हा महामंत्री कांचन गहाणे, शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष अन्गेश बेहलपाडे, महिला मोर्चा अध्यक्षा सौ.माहेश्वरी नेवारे, प्रमोद प्रधान तसेच पदाधिकारी उपस्थित होते.







