गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी इ.आर.पी. कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली.
नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मास्टरसॉफ्टचे ईआरपी सॉफ्टवेअर दैनंदिन कामासाठी वापरतात. शासनाने नवीन शिक्षण धोरण २०२० ची अंमलबजावणी करीत आहे. तद्वतच कामाची पद्धती बदलली असल्याने प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सपोर्ट अँड इम्प्लीमेंटेशन इंजिनिअर आशिष बोरकर यांनी संगणक सादरीकरण करून मार्गदर्शन केले. व उपस्थितांच्या शंकेचे निराकरण केले. यावेळी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र मोहतुरे यांनी आजच्या कामाच्या वातावरणात ईआरपी सॉफ्टवेअरची आवश्यकता आणि त्यामधील प्रशिक्षणाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे संचालन प्रा. रत्ना बिस्वास तर आभार डॉ. भावेश जसानी यांनी मानले. कार्यशाळेला अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अंबादास बाकरे, मानव्यशास्त्र विद्याशाखा प्रमुख डॉ. एच.पी. पारधी, वाणिज्य विद्याशाखा प्रमुख डॉ. सरिता उदापूरकर, शिक्षकेतर कर्मचारी पर्यवेक्षक मोरेश्वर देशभ्रतार आणि महाविद्यालयीन प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Home गोंदिया जिल्हा NMD महाविद्यालयात प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी ईआरपी कार्यशाळागोंदिया (प्रतिनिधी)







