Home Uncategorized कोसमतोंडी-सातलवाडा-विर्शी मार्ग देताहेत अपघाताला आमंत्रण

कोसमतोंडी-सातलवाडा-विर्शी मार्ग देताहेत अपघाताला आमंत्रण

80
0

रस्त्याची सायडींग न भरल्याने बस उतरली खाली; मात्र मोठा अनर्थ टळला

सडक अर्जुनी, (गोंदिया) : सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदिया अंतर्गत उपविभागिय बांधकाम विभाग सडक अर्जुनी अंतर्गत कोसमतोंडी-सातलवाडा-विर्शी मार्गावरील कोसमतोंडी ते हेटी या 5 किमी. रस्त्याचे बांधकाम ४-५ महिन्याआधी करण्यात आले. परंतु डांबरीकरण केलेल्या रोडाचे दोन्ही बाजूची मुरूमाने सायडींग न भरल्याने तीन दिवसापूर्वी साकोली आगाराची बस सांयकाळी परत जात असतानी विरुद्ध दिशेने ट्रक येत असल्याने रोडाचे साईडला बस करतानी रोडाचे खाली बस स्लीप होऊन घसरली. ड्राॅयव्हरच्या समयसुचकतेने प्रवासी वाहतूक करणा-या बसचा मोठा अनर्थ टळला. अन्यथा मोठा अपघात घडला असता. तसेच दुस-या दिवशी याच मार्गावर चारचाकी वाहन फसले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षितपणामुळे सदर मार्ग अपघाताला आमंत्रण देणारा मार्ग बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या मार्गावर एखाद मोठ्या दुर्घटनेची वाट बघत आहे काय? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. ”कोसमतोंडी-सातलवाडा-विर्शी मार्ग धोकादायक”या मजकुराची बातमी वृत्तपत्रात याच महिन्यात प्रकाशित करण्यात आली होती. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. सदर मार्ग गोंदिया व भंडारा जिल्ह्याला जोडणारा मार्ग आहे. या मार्गावर रात्रंदिवस वाहनाची रेलचेल असते. तसेच साकोली आगारावरून बससेवा सुरू आहे. सदर मार्गाचे डांबरीकरणाचे काम झाल्यानंतर कंत्राटदाराने रोडाची दोन्ही बाजूची सायडींग न भरता रोडाचे बाजूची माती काढून सायडींग भरल्याचा देखावा केला. त्यामुळे नुकतीच या मार्गावरून प्रवासी वाहतूक करणारी बस चिचटोला ते बेहळीटोला दरम्यान चिखलात फसली. सदर बसला काढण्याठी दुसरी बस आणण्यात आली. पण तरीसुद्धा बस निघाली नाही. सदर बसला काढण्यासाठी जेसीबी बोलावून जेसीबीच्या सहाय्याने बस काढण्यात आली. बस फसल्याची घटना घडली त्याच्या दुस-या दिवशी चिचटोला ते बेहळीटोला दरम्मान चारचाकी वाहन फसले. या चारचाकी वाहनाला ट्रॅक्टरचे सहाय्याने काढण्यात आले. सुदैवाने दोन्ही अपघातात कोणतीही अनुचीत घटना घडली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुर्लक्षपणामुळे कंत्राटदाराने या मार्गावर दोन वाहनाचे क्राॅसिंग करतानी रोडाच्या कडेला सायडींग न टाकल्याने तसेच रोलरने दबाई न केल्याने सदर घटना घडली आहे. या प्रकारामुळे रहदारी करणा-या नागरिकांना त्रास सोसावा करावा लागत आहे. याकडे आतातरी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन रोडाचे कडेला मुरुम टाकून रोलरने दबाई रोड संमातर करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.