गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने तसेच स्थानिक आवाज इंडिया टीव्ही, मैत्री मल्टीपर्पज सोशल वेल्फेअर सोसायटी व विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने भारतीय संविधानाच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित्त आणि महाड सत्याग्रह क्रांती दिनाच्या 100 व्या वर्षात पदार्पणानिमित्त “घर घर संविधान मेळावा” हा समतेचा वैचारिक व सांस्कृतिक महोत्सव 21 मार्च 2026 रोजी भीमनगर ग्राउंड, गोंदिया येथे उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर महाराष्ट्र गीत व भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले.मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, खापर्डे कॉलोनी येथील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर विविध वसतिगृहांतील विद्यार्थिनींनी देशभक्तीपर नृत्य, संविधान जागृती पथनाट्य व वक्तृत्वाद्वारे प्रभावी सांस्कृतिक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमात विविध सामाजिक संघटनांचे मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये अतुल सतदेवे, प्रा. डॉ. दिशा गेडाम, सी. पी. बिसेन, वसंत गवळी, भोजराज ठाकरे, प्रा. मनोज मेश्राम, दीपा काशीवार, तिलक दीप, कैलाश भेलावे, आदेश गणवीर, पौर्णिमा नागदेवे, रश्मी येसनसुरे, प्रियांका, मनोहर भावे, एड. सचिन राहुलकर कैलाश डोंगरे, कमल बोंबार्डे आदींचा समावेश होता. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यामध्ये लक्ष्मण खेडकर, गृहपाल उज्वला रामटेके, आशा मेश्राम, अश्विनी दिघोरे, खराबे सर, गिरी सर आदी उपस्थित होते.या महोत्सवात “संविधान जलसा – शिवराय ते भिमराय” या संकल्पनेवर आधारित जाधव सिस्टर्स यांचा प्रेरणादायी संगीतमय कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला. सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत करणार्यांना संविधान प्रास्ताविका भेट करण्यात आले समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रसार व्हावा तसेच महामानवांच्या विचारांचा व्यापक प्रचार व्हावा, या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाला प्रा.डॉ. दिशा गेडाम यांनी मार्गदर्शक म्हणून संबोधित केले, संचालन गृहपाल उज्ज्वला रामटेके, उपस्थितांचे आभार अतुल सतदेवे यांनी मानले.







