Home गुन्हेवार्ता कारची कारला मागून धडक; अनर्थ टळला, डोंगरगाव शिवारातील घटना

कारची कारला मागून धडक; अनर्थ टळला, डोंगरगाव शिवारातील घटना

22
0

गोंदिया : तिरोडा-गोंदिया मार्गावर भरधाव चारचाकी वाहनाने समोरील चारचाकी कारला जबर धडक दिली. या घटनेत असंतुलित झालेली कार रस्त्याकडील कंपाऊंड वॉल तोडत घरात शिरली. ही घटना डोंगरगाव बसस्थानकाजवळ आज (ता.२२) दुपारी ३.३० ते ४ वाजता सुमाराची आहे. या घटनेत दोन्ही कारमध्ये बसलेले नागरिक थोडक्यात बचावले. सविस्तर असे की, तिरोडा-गोंदिया मार्गावर तिरोडाकडून गोंदियाकडे येत असलेले कार क्र.एमएच-३५/एडब्ल्यु-७५३६ व एमएच-०२/एक्यु-०४५९ दोन्ही समान अंतर राखून प्रवास करीत होत्या. दरम्यान डोंगरगाव शिवारातील बसस्थानकाजवळ कार क्र.एमएच-३५/एडब्ल्यु-७५३६ च्या चालकाने लापरवाहीने चालवून समोर असलेल्या कार क्र.एमएच-०२/एक्यु-०४५९ ला मागून जबर धडक दिली. या घटनेत अनियंत्रित झालेली कार क्र.एमएच-०२/एक्यु-०४५९ थेट रस्त्या शेजारी असलेल्या एका घराच्या कंपाऊड वालवर धडकली. या अपघातात सुदैवाने जिवीतहानी टळली. मात्र दोन्ही वाहनात बसलेले किरकोळ जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, कार क्र.क्र.एमएच-३५/एडब्ल्यु-७५३६ च्या चालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळ गाठून मदत कार्य केले. तसेच घटनेची माहिती गंगाझरी पोलिसांना देण्यात आली. बातमी लिहेपर्यत या घटनेची नोंद पोलिसात झालेली नव्हती.