गोंदिया : कामठा (मध्यकाशी) येथील संत श्री लहरी आश्रम संस्था येथे गुरुपौर्णिमेचा पवित्र सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष संत डॉ. खिलेश्वरनाथ उर्फ तुकड्या बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष गोपाळ बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.परमपूज्य संत श्री जयरामदास ऊर्फ लहरी बाबा यांच्या समाधीवर भाविकांनी पुष्प अर्पण करून पूजा केली. प्रसिद्ध भजन गायक तुलसी पंचेश्वर, डॉ.देवीराम माने, दीपक कुंदनानी, मुरलीधर वंजारी आदींनी भजने सादर केली. तत्पूर्वी पहाटे 45 भाविकांनी संत तुकडय़ा बाबांकडून दीक्षा घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना तुकडय़ा बाबांनी या दिवसाचे महत्त्व सांगून गुरू आणि शिष्याचे नाते सविस्तर सांगितले. यानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये डॉ. लाडे, डॉ. कुंदनानी आणि त्यांच्या टीमने आपली सेवा दिली. त्यानंतर ‘श्री लहरी भक्त निवास’चा पायाभरणी समारंभ पार पडला. या कार्यक्रमात तुकड्या बाबा, गोपाळ बाबा, सुशीलाताई खरकाटे, वास्तुविशारद सुनील तरोणे, संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या सदस्या नीलम कटियारमल, माजी आमदार अधिवक्ता संजय धोटे, नंदकिशोर, डॉ. शहारे, रामकृष्ण वाघाडे, सचिव गोविंद मेश्राम, खजिनदार गोपाल मते, संजय तराळ, दीपक कुंदनानी, विजय सातपुते, विधी सल्लागार अधिवक्ता अनिल ठाकरे, गोपीचंद बलवाणी, मनोहर गोन्नाडे, अरुण मते, मुरलीधर वंजारी, संजय कुरंभट्टी, शंकरलाल कुंदनानी, संजय कुंदनाडे, गोविंद कुंदनानी , विट्ठल भरणे उपस्थित होते. नव्या सुविधेमुळे भाविकांचा आश्रमातील वास्तव्य अधिक सुखकर होणार असल्याचे सांगण्यात आले. शेवटी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी लहरी युवा मंचचे विकास राजूरकर, जयंत खरकाटे, सुरेंद्र खरकाटे, विवेकानंद खरकाटे, अविनाश चौधरी, मोहन गौरखेडे, महिला मंचच्या भारती कुरमभट्टी, अपूर्व गौरखेडे, पुष्पा शहारे, अविनाश पराते, राम वाघाडे, अरुण हाडगे आदी उपस्थित होते. संचालन विश्वस्त संजय तराळ यांनी केले तर आभार सचिव गोविंद मेश्राम यांनी मानले.

