गोंदिया : लोकसभा निवडणुकीनंतर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगांव येथील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेत खासदार सुनील मेंढे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. निवडणुकीच्या काळात परिश्रम घेणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे यावेळी खासदार सुनिल मेंढे यांनी आभार मानले. प्रत्येकच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपली समजून परिश्रम घेतले. या परिश्रमातून विजयाचा मार्ग निश्चित सुकर होईल, असा विश्वास यावेळी खासदार मेंढे यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत समाधान काढण्याचे आश्वासन यावेळी दिले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष विजय कापगते, जि.प. सदस्य रचना गहाने, गटनेते जि.प. गोंदिया लायकराम भेंडारकर, जि.प.सदस्य जयश्री देशमुख, जि.प.सदस्य पौर्णिमा ढेंगे, खरेदी विक्री सभापति केवळराम पुस्तोडे, राजहंस ढोक, पं. स. उपसभापती होमराज पुस्तोडे, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रकाश गहाणे, पं. स. सदस्य तथा जिल्हा महामंत्री डॉ.नाजूक कुंभरे, चामेश्र्वर गहाने, लैलेश्वर शिवणकर, डॉ. गजानन डोंगरवार, महामंत्री भोजुजी लोगडे, न.पं.अर्जुनी मोरगावचे बांधकाम सभापति राधेश्याम भेंडारकर,नगरसेविका ममता भैय्या, नगरसेविका सपना उपवंशी, आर. के. देशमुख, मीना शहारे, युवा मोर्चा अध्यक्ष पराग कापगते व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

