Home Uncategorized खोडशिवनी रेल्वे स्थानकात सोयी सुविधांचा अभाव; प्रवाश्यांची गैरसोय

खोडशिवनी रेल्वे स्थानकात सोयी सुविधांचा अभाव; प्रवाश्यांची गैरसोय

87
0

स्टेशनवर लाईटची सुविधा असूनसुद्धा रात्री लाईट बंद ; अधिकाऱ्याचे दुर्लक्ष

सडक अर्जुनी, (गोंदिया) : गोंदिया-बल्लारशाह लोहमार्गावरील सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी रेल्वे स्टेशस्थानकावर सोयी सुविधांचा अभाव असून प्रवाश्यांची गैरसोय होत आहे. मात्र रेल्वे प्रशासन व अधिकारी यांनी दुर्लक्ष केले आहे. या लोहमार्गावरून दिवसभर पॅसेंजर व मालगाडी चालतात. गोंदिया-बल्लारशाह चांदाफोर्ट रेल्वेगाडीचे खोडशिवनी रेल्वे स्टेशनवर थांबा आहे. या रेल्वे स्टेशनवर इलेक्ट्रीक लाईनची सुविधा असून कित्येक महिन्यापासून लाईट रात्री बंद आहे. रात्रीच्या वेळी लाईट बंद राहत असल्याने प्रवाशांना रात्री रेल्वेगाडीवर चढतानी व उतरतानी अंधारात त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्यावेळी स्टेशनवर अंधार राहत असून प्रवाश्यांची गैरसोय होत आहे. रात्रीला लाईट बंद राहत असल्याने चढतांनी व उतरतांनी प्रवाशांचा अपघात होऊ शकतो, हे नाकारता येत नाही. तसेच येथील टिकीट एजंट सांयकाळपर्यंत राहत नसल्याने प्रवाश्यांना विना तिकीट प्रवास करण्याची पाळी येते. या स्टेशनवर सुलभ शौचालयाची सुविधा नसून महिला प्रवाशांना स्टेशनच्या आजूबाजूला आडोसाला शौचास जावे लागते. केंद्र शासनाची स्वच्छ भारत योजनेंचा रेल्वे प्रशासनाला विसर पडलेला दिसत आहे. त्यामुळे या स्टेशनवर सुलभ शौचालयाची व्यवस्था करण्यात आली नसल्याचे दिसून येते. खोडशिवनी रेल्वे स्टेशनवर अनेक सोयी सुविधा उपलब्ध नसून समस्यांचे माहेरघर बनले आहे. सदर समस्यांचे त्वरीत निराकरण रेल्वे प्रशासनाने करावे. तसेच येथील इलेक्ट्रीक लाईन त्वरीत सुरू करावी, अशी मागणी प्रवाश्यांनी केली आहे.